NCC च्या विद्यार्थ्यांकडून प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडी येथे स्वच्छता मोहीम

NCC च्या विद्यार्थ्यांकडून प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडी येथे स्वच्छता मोहीम

*कोंकण एक्सप्रेस*

*NCC च्या विद्यार्थ्यांकडून प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडी येथे स्वच्छता मोहीम.*

*कणकवली ः संजना हळदिवे*

प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडी व माध्यमिक विद्या मंदिर कनेडी आणि ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी द्वारे शनिवार,दिनांक:२० डिसेंबर २०२५ रोजी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

या एक दिवशीय स्वच्छता मोहिमेत कनेडी प्रशालेतील एनसीसी च्या एकूण 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून प्राथमिक आरोग्य केंद्र, कनेडी परिसराची संपूर्ण स्वच्छता केली.

एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेट कोर्स ही भारतीय सशस्त्र दलाची युवा शाखा आहे. या संस्थेचा उद्देश विद्यार्थ्यांना शिस्त, नेतृत्व आणि देशभक्तीच्या भावनाने प्रेरित करणे आहे. एनसीसी च्या विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण, कवायती, फायरिंग, ड्रील, खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम याविषयी प्रत्यक्ष अनुभव दिले जातात तसेच सामाजिक स्वच्छता उपक्रम व अभियान राबवून सामाजिक स्वच्छतेचा संदेश दिला जातो.
या प्रशिक्षणार्थी एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सहा.शिक्षक श्री.सागर गुरव तसेच प्रा.ओ.केंद्र कनेडी, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेस्त्री मॅडम, डॉ.भोसले मॅडम, सर्व आरोग्य कर्मचारी रुंद या वेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!