जि. प. आरोग्य सभापती डॉ. अनिषा दळवी यांनी केली कोव्हीड सेंटरची पाहणी

जि. प. आरोग्य सभापती डॉ. अनिषा दळवी यांनी केली कोव्हीड सेंटरची पाहणी

*कोकण Express*

*जि. प. आरोग्य सभापती डॉ. अनिषा दळवी यांनी केली कोव्हीड सेंटरची पाहणी*

*आरोग्य विभागाचा आढावा घेत खबरदारी घेण्याचा दिला इशारा*

*दोडामार्ग ः प्रतिनिधी*

कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून दोडामार्ग तालुक्यात कोरोनाचा प्रसार आता ग्रामीण भागांतही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे त्यामुळे संपूर्ण यंत्रणा हादरून गेली आहे,याचं संदर्भात आज पंचायत समिती दोडामार्ग येथे वैदयकीय अधिकारी यांच्या समवेत बैठक पार पडली.यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी यांनी योग्य ती खबरदारी व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या,त्यानंतर त्यांनी कोविड सेंटर ला भेट देत रुग्णांची विचारपूस सुध्दा केली. सर्दी, खोकला,ताप ही कोरोना विषाणू आजाराची सर्वसामान्य लक्षणे दिसून येतात. श्वास घ्यायला त्रास होणे, श्वासात अडथळा येणे अशी काहीशी गंभीर स्वरूपाची श्वसन संस्थेची लक्षणे तसेच न्युमोनिआ, पचनसंस्थेची अतिसारासारखी लक्षणे, तसेच प्रतिकार शक्तीची कमतरता असलेल्या व्यक्तींमध्ये लक्षणे आढळून येऊ शकतात. विषाणूचा प्रसार मोठया प्रमाणात होत असल्याने प्रतिबंधात्मक खबरदारी घ्यावी लागणार आहे सर्वसाधारणपणे आजाराचे स्वरुप लक्षात घेता हा आजार होऊ नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. यामध्ये, श्वसन संस्थेचा आजार असलेल्या व्यक्तीशी निकट सहवास टाळणे, हातांची नियमित स्वच्छता, फळे व भाज्या न धुता खाणे टाळणे, खोकताना वा शिंकताना नाका-तोंडावर रुमाल/टिश्यु पेपरचा वापर करणे व अशाप्रकारे वापरलेले टिश्यु पेपर ताबडतोब व्यवस्थित झाकण असलेल्या कचरा पेटीत टाकणे अशा प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. तसेच गोव्यामधून दररोज येणा-या जाणाऱ्या सर्व नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.घरी आल्यानंतर उगाच बाहेर न फिरता घरामध्येच (Home Isolation) राहून काळजी घेणे गरजेचे आहे.वरील कोणतीही लक्षणे आढळून आल्यास जवळपास च्या आरोग्य केंद्रामध्ये कळविण्यात यावे. तरी नागरिकांनी काळजी घ्यावी परंतु घाबरून जाऊ नये असे आवाहन जि. प शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी यांच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी डॉ. रमेश कर्तस्कर,डॉ.तुषार चिपळूणकर, डॉ गजानन सारंग,डॉ. अंधारी त्याचं बरोबर इतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!