*कोंकण एक्सप्रेस*
*शिरगांव हायस्कुल शिरगांव च्या 1995 -96 बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा 28 डिसेंबर ला गेट-टुगेदर सोहळा*
*शिरगांव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील शिरगाव पंचक्रोशी ( तालुका देवगड ) शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता दहावी बॅच 1995 – 96 या माजी विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर सोहळा रविवार दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता शिरगाव हायस्कूल शिरगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये आदरणीय शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
30 वर्षांपूर्वी आपण सर्वांनी एकत्र शालेय जीवनातील अनमोल क्षण अनुभवले आज पुन्हा त्या गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याला सर्व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिरगाव हायस्कूल शिरगाव बॅच 1995 – 96 चे सर्व मित्र परिवार यांनी केले आहे. तरी यासाठी ग्रुप ॲडमिन संतोष जंगले ( 94 2030 52 64 ), पुनम साटम ( 96 64 16 6 9 9 1 ), सुनील सावंत ( 98 20 96 87 71 ), विजय गाडी ( 99 200 81 070 ), पूनम कुबडे ( 8408090361 ), प्रफुल्ल घाडी ( 98 20 29 64 80 ) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

