*कोकण
*खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग बांधवांना अनुदान वाटप*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने येथील मतिमंद, अपंग, मूकबधिर दिव्यांग नागरिकांना लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत फंडातून प्रत्येकी २ हजार रुपये रकमेचा धनादेश इतके अनुदान देऊन आर्थिक सहाय्य खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खारेपाटण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जी. आर. वेंगुर्लेकर, ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटणकर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर आदी उपस्थित होते. खारेपाटण येथील एकूण ४५ अपंग लाभार्थी बांधवांना सुमारे ९० हजार रूपये एवढ्या अर्थसहायाचे वाटप यावेळी करण्यात आले. तसेच सर्व दिव्यांग व्यक्तींना मास्कचे देखील वाटप करण्यात आले.
“सध्याचा कोरोना व लॉकडाऊनचा काळ पाहता खारेपाटणमधील अपंग दिव्यांग बांधवांना जीवनाआवश्यक वस्तूंची खरेदी करता यावी व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने अर्थसहाय्य करण्यात आले, असे खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी स्पष्ट केले.