*कोंकण एक्सप्रेस*
*कासार्डे विद्यालयातील तीन संघाची कोल्हापूर विभागीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड..*
*प्रशालेचे जिल्हास्तरीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व….*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेमध्ये कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्या सहा संघाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या स्पर्धेत ७२ खेळाडू यशस्वी ठरले आहेत.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये नितेश गावडे,अनिकेत पवार,निखिल पन्हाळकर ,दत्तराज केसरकर,वेदांत चव्हाण यांनी तर १९ वर्षांखालील मुलांच्या संघातील भूकेश सुतार अजय पवार दुर्वेश गोसावी निहार तांबे,सार्थक गुरव आदींच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विजयश्री खेचून आणली. तर १७ वर्षांखालील मुलींच्या संघातील भक्ती लाड,स्वरा मोहिते, गार्गी पाताडे,पूर्वा आईर,सलोनी पाताडे तन्वी जाधव यांच्या उत्कृष्ट खेळीने विजय संपादन केला.
चौकट
प्रशालेच्या तीन संघांना विजेते व तीन संघांना उपविजेते पद
या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रशालेच्या १७ वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या संघांने तर १९ वर्षांखालील मुलांच्या संघांने विजेतेपद पटकावले तर १४ वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या संघांने आणि १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले आहे.
या यशस्वी संघामधून विजेत्या संघाची आपल्याच जिल्ह्यातील वामनराव महाडिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेरे, येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,देवेंद्र देवरुखकर,यशवंत परब,तृप्ती कुडतरकर,पुजा पाताडे,वैष्णवी डंबे, विनायक पाताडे,दिवाकर पवार,नवनाथ कानकेकर यांच्यासह विद्यालयाच्या क्रीडा विभागातील इतर सर्व शिक्षकांचेही विशेष मार्गदर्शन लाभले.
यास्पर्धेतील सर्व यशस्वी खेळाडूंचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष मनोज शेलार,सरचिटणीस रोहिदास नकाशे,स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष संजय पाताडे व स्कुल कमिटीचे सर्व सदस्य तसेच संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी तसेच कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पालक-शिक्षक संघ,विद्यालयाच्या प्राचार्या सौ.बी.बी.बिसुरे,पर्यवेक्षक एस. व्ही. राणे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम.नीलिमा अडसूळ, क्रीडा अधिकारी शितल शि़दे, क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, सचिन रणदिवे आदींनी अभिनंदन करून कोल्हापूर विभागीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.कोल्हापूर विभागीय स्पर्धा दि.२३ व २४ डिसेंबर २०२५रोजी तळेरे हायस्कूल येथे होणार आहे.

