लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात “खाद्य महोत्सव” २०२५’ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात “खाद्य महोत्सव” २०२५’ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

*कोंकण एक्सप्रेस*

*लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात “खाद्य महोत्सव” २०२५’ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..*

*दोडामार्गः शुभम गवस*

येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि हॉस्पिटॅलिटी स्टुडीज विभागाच्या संयुक्त विद्यमाने “खाद्य महोत्सव २०२५” साजरा करण्यात आला. विस्तार विभागात प्रवेशित विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या अन्नपूर्णा योजनेंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिकता, विक्री-व्यवस्थापन कौशल्ये व नेतृत्वगुण विकसित करून त्यांचा सर्वांगीण विकास साधावा या उद्देशाने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन यावर्षी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे जिल्हा क्षेत्र समन्वयक प्रा. उमेश परब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या छोले पुरी, मालपुवा, पाणी पुरी, शेवपुरी, मोमोज, छोले पाव, भाजी पाव, फ्रूट चाट, व्हेज पॅटीस, चिकन कॅफ्रेअल, मोहितो इ. पदार्थांची मेजवानी उपस्थितांना घेता आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी विभागाचे विस्तार कार्य शिक्षक डॉ. सोपान जाधव, हॉस्पिटॅलिटी स्ट्डीजचे विभागप्रमुख प्रा. रोहन बागकर, प्रा. प्रथमेश ठाकूर, प्रा. दर्शनी कोटकर, इतर प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय सत्र प्रशिक्षण कार्यक्रमात प्रा. परब यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आजीवन अध्ययन व विस्तार विभागाची कार्यपद्धती, त्यामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम व प्रकल्प यांची सविस्तर माहिती दिली. तसेच मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘उडान’ महोत्सवाचे उद्दिष्ट, स्वरूप आणि त्यातून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या संधी यांविषयीही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!