वाघेरी येथे उद्या वार्षिक जत्रोत्सव  लोकमत न्यूज नेटवर्क*

वाघेरी येथे उद्या वार्षिक जत्रोत्सव  लोकमत न्यूज नेटवर्क*

*कोंकण एक्सप्रेस*

*वाघेरी येथे उद्या वार्षिक जत्रोत्सव  लोकमत न्यूज नेटवर्क*

*कणकवली ः संजना हळदिवे*

तालुक्यातील वाघेरी गावचे ग्रामदैवत श्री लिंगेश्वर व श्री पावणादेवीचा वार्षिक जत्रोत्सव १९ डिसेंबर रोजी होणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

या वार्षिक जत्रोत्सवाच्या निमित्ताने मुंबई तसेच इतर ठिकाणांहुन वाघेरी येथील मूळ रहिवासी गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.
यात्रोत्सवाच्या दिवशी सकाळपासूनच ग्रामदेवतांच्या  दर्शनासाठी मंदिरात भाविक गर्दी करीत असतात. माहेरवासिनी देवीची ओटी भरण्यासाठी वाघेरी येथे मोठ्या संख्येने येतात.  यात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. ती लक्षवेधी अशीच असते.
रात्री ११ वाजल्यानंतर देवतरंगांसह वाजत गाजत,हरीनामाच्या गजरात श्री लिंगेश्वराची भेट घेण्यात येते.त्यानंतर गोरे दशावतार नाट्य मंडळाकडून नाटयप्रयोग सादर करण्यात येतो. यावेळीहि भाविकांची गर्दी होत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!