*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कॅरम या खेळात विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी कु.जान्हवी प्रविण सोनार हिने पटकावला द्वितीय क्रमांक.*
*कणकवली ः संजना हळदिवे
विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणारी कु. जान्हवी प्रविण सोनार हिने तालुकास्तरीय कॅरम या खेळात प्रथम क्रमांक प्राप्त करून घवघवीत यश मिळविले. त्यानंतर कुडाळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कॅरम या खेळात 14 वर्षाखालील मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
जिल्हास्तरावर तिने घवघवीत यश प्राप्त केले असून तिची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळासाठी कु. जान्हवी हिला क्रीडा शिक्षिका सायली गोरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल कु.जान्हवी चे संपूर्ण प्रशालेतून कौतुक होत आहे.त्याचप्रमाणे
कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय तवटे साहेब, चेअरमन डॉ.सौ. राजश्री साळुंखे मॅडम, सेक्रेटरी श्री. विजयकुमार वळंजू साहेब, ट्रस्टी श्री. अनिलपंत डेगवेकर साहेब यांनी कौतुक केले. त्याचप्रमाणे विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ .श्री. पी. जे. कांबळे सर ,पर्यवेक्षक श्री.अच्युतराव वणवे सर, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. दिव्या सावंत मॅडम, पर्यवेक्षिका सौ. श्रुती बावकर मॅडम यांनी अभिनंदन केले आणि पुढील होणा-या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

