डॉ. नागवेकर दवाखाना तोडफोड प्रकरणातील संशयितांवर कारवाई करा

डॉ. नागवेकर दवाखाना तोडफोड प्रकरणातील संशयितांवर कारवाई करा

*कोंकण एक्सप्रेस*

*डॉ. नागवेकर दवाखाना तोडफोड प्रकरणातील संशयितांवर कारवाई करा*

*डॉक्टर असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अन्यथा जिल्ह्यात दवाखाने बंद आंदोलन कायम करण्याचा इशारा*

*सिधुदुर्ग दि. १६ डिसेंबर*

कणकवली येथील डॉ. नागवेकर यांच्या दवाखान्यामध्ये घडलेली घटना ही निंदनीय आहे. या घटनेची पोलिसांकडून योग्य ती चौकशी होत नाही, तसेच गुन्हे दाखल करताना आरोपींवर आवश्यक ती कलमे लावण्यात आलेली नाहीत. मध्यस्थी करायला आलेल्या त्या व्यक्तींवर अटकेची कारवाई झाली नाही, या दृष्टीने आपण पोलीस आणि जिल्हा प्रशासन म्हणून योग्य ती दखल घेऊन गुन्ह्यात समाविष्ट असलेल्या संबंधितांना तात्काळ अटकेची कारवाई करावी. अन्यथा जिल्ह्यात दवाखाने बंद आंदोलन कायम करण्याचा इशारा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना डॉक्टर असोसिएशनच्यावतीने देण्यात आला आहे.

सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी तृप्ती थोडमिसे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टर असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. अनंत नागवेकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, डॉ. पाताडे, डॉ. रेडकर व जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोड मिसेयांनी या घटनेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांच्याशी काही चर्चा झाली असून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी डॉ राजेंद्र पाताडे, डॉ सुहास पावसकर, नागवेकर कुटुंबातील डॉ संजय केसरे, डॉ प्रफुल्ल आंबेरकर, अजित लिमये, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. मिलिंद खानोलकर, डॉ. मकरंद परुळेकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, मिलिंद बोर्डवेकर, डॉ. अभिजित वाढे, डॉ. शिल्पा झांट्ये, डॉ लीना लिमये, डॉ. गीता मोघे, डॉ. शमिता बिरमोळे, डॉ. गौरी गणपत्ये, डॉ. गौरी परुळेकर, डॉ. जयसिंग रावराणे, डॉ. नितीन शिये, डॉ. प्रशांत कोलाटे, डॉ. शंतनू तेंडुलकर, डॉ. अमोल झांट्ये, डॉ. मिलिंद काळे, डॉ राजेश्वर उबळे, डॉ. गिरीश राणे, डॉ. बावधनकर, डॉ. विजय पोकळे, डॉ. विनय शिरोडाकर आदी उपस्थित होते.

या घटनेची योग्य ती चौकशी करुन महिला डॉक्टरांना सुरक्षा दृष्टीने डॉक्टर अॅक्ट चा वापर आवश्यक आहे. तो पोलीसांनी केला

नाही. येत्या २४ तासात योग्य ती दखल न घेतल्यास आम्हाला हा बंद कायम ठेवावा लागेल तसेच महिला डॉक्टरांना उपोषणासही बसावे लागेल. नागवेकर डॉक्टर यांच्यावर झालेल्या या घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यातील अन्य डॉक्टरांवर होणार नाही, या दृष्टीने जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या डॉक्टर कायद्याची योग्य ती अंमलबजावणी झाली पाहिजे, घडलेल्या घटनेची माहिती कथन करत तोडफोड होताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही , यामागे कोणाचा हात आहे. असा सवाल डॉ. जयेंद्र परुळेकर व अन्य डॉक्टर यांनी केला.

येत्या २४ तासात योग्य ती कारवाई करून संबंधितांना अटक न झाल्यास आम्हा जिल्ह्यातील डॉक्टरांना हा बंद कायम ठेवावा लागेल. वेळ पडल्यास महिला डॉक्टरांना मिळालेली वागणूक आणि जमावाकडून नागवेकर दवाखान्यात महिला डॉक्टर

नागवेकर यांच्या बाबत झालेला प्रकार या दृष्टीने आम्हाला उपोषण करावे लागेल. त्या दृष्टीने योग्य ती कलमे लावून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, ज्यावेळी घटना घडत होती. त्यावेळी पोलीस बघ्याची भूमिका का घेत होते? दरदरम्यानच्या कालावधीत हवेत फायरिंग पोलिसांनी का केली नाही? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार जिल्हाधिकाºयांसमोर करत या घटनेच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करा, असे निवेदन डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आणि महिला डॉक्टर यांच्या वतीने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना सादर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!