*कोंकण एक्सप्रेस*
*वैयक्तिक अजेंडा यामध्ये येता कामा नये, जिल्हा बँकेवर आरोप नको*
*शिवसेना आमदार निलेश राणे यांचा राजन तेली यांनी केलेल्या टीकेवर टोला; महायुतीमध्ये चांगलं वातावरण राहो, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत..*
*सिंधुदुर्ग ः संजना हळदिवे*
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे हे आपल्या संचालक मंडळासह शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला सहकार क्षेत्रात सर्वोत्तम बनविण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. ही बँक गेली अनेक वर्षे आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे राज्यात अव्वल राहिली आहे, अशा शब्दात जिल्हा बँकेचे कौतुक शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केलेल्या सोशल मीडिया अकाउंट वरील पोस्टवर केले आहे.
राज्यस्तरावरील विविध पूरस्कार हे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेने मिळवले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, शेती पूरक संस्था, सहकारी संस्था यांच्या हिताच्या दृष्टीने जिल्हा बँक कार्यरत आहे.
आता सगळं चांगलं चालू असताना महायुतीमध्ये चांगलं वातावरण राहो यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. वैयक्तिक अजेंडा यामध्ये येता कामा नये, बसून चर्चेमधून मार्ग निघू शकतो पण टीका करायची काही गरज नाही, असा टोला शिवसेना आमदार निलेश राणे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत नाव न घेता राजन तेली यांनी केलेल्या टीकेवर भूमिका मांडली आहे.

