*कोकण Express
*सिंधुदुर्गाबाहेरून येणाऱ्यांवर ग्राम व वॉर्ड नियंत्रण समितीने लक्ष ठेवावे….*
*जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; गृह अलगीकरणातही नियमांचे पालन होते,की नाही पहा…*
*सिंधुदुर्गनगरी ता.१६:*
जिल्हयाबाहेरुन येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी व आरोग्य चाचणी झाली की नाही,याबाबत ग्रामनियंत्रण समिती व वॉर्ड नियंत्रण समितीने दक्षता घ्यावी,अशा सुचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी देण्यात आल्या आहेत.दरम्यान गृह अलगीकरणात असलेले नागरिक नियमांचे पालन करीत आहेत,अगर कसे? व संबंधित नागरिक हे बाहेर फिरणार नाहीत,यावर देखरेख ठेवावी,असेही त्यांनी म्हटले आहे.याबाबत जिल्हाधिका-यांकडून आज काही माहिती व जबाबदा-या देण्यात आल्या आहेत.