पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या नवीन कुर्ली येथील रस्ते डांबरीकरण कामांचे भुमिपूजन संपन्न

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या नवीन कुर्ली येथील रस्ते डांबरीकरण कामांचे भुमिपूजन संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या नवीन कुर्ली येथील रस्ते डांबरीकरण कामांचे भुमिपूजन संपन्न*

*माजी सभापती मनोज रावराणे यांचे विशेष प्रयत्न*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली येथील अंतर्गत मुख्य रस्ता शांताराम पारके घर ते यशवंत कामतेकर यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता तसेच महादेव कदम घर ते दिनेश तेली यांच्या घरापर्यंत जाणा-या रस्त्यांचे डांबरीकरणे या कामांचे आज भूमिपूजन करण्यात आले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तसेच कणकवली माजी सभापती मनोज रावराणे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाच्या पाठपुराव्याने सुमारे २० लाख रुपये निधी रस्ता डांबरीकरण साठी मंजूर करण्यात आला. या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलताना माजी सभापती मनोज रावराणे यांनी सांगितले की थोड्या दिवसात पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या माध्यमातून नवीन कुर्ली गावातील राहिलेली सर्व विकास कामे करण्यात येतील अशी ग्वाही दिली.
मंजुर केलेल्या कामाचे भुमिपूजन मा. सभापती मनोज रावराणे आणि भाजप महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा सरचिटणीस राजन चिके यांच्या शुभहस्ते पार पडले. या प्रसंगी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, उपाध्यक्ष सुरज तावडे ,सचिव धीरज हुंबे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित दळवी, भाजपा बूथ अध्यक्ष अतुल डऊर, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप कामतेकर, नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष अरुण पिळणकर, कृष्णा परब, प्रशांत दळवी, मिहीर मराठे,सखाराम हुंबे, बाळकृष्ण चव्हाण,आशिष पेडणेकर, राजेंद्र तेली,विजय आग्रे, पांडुरंग कोलते, केशव दळवी, कल्पेश कदम, अनंत दळवी , गणेश साळसकर,अंकुश दळवी, विजय राणे, वसंत ऐंडे, प्रकाश आग्रे, पांडुरंग चव्हाण, शिवाजी तावडे, सुनील गोसावी, मुन्ना जाधव ,विजय कोलते, अरुण पाटील, मनोज ऐंडे,सचिन साळसकर, सचिन परब,अनिल दळवी ,शिवाजी चव्हाण,जयवंत कामतेकर, विद्याधर तांबे, चंद्रकांत मर्गज गावातील ग्रामस्थ तसेच महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.
काही दिवसांपासून नवीन कुर्ली गावात एका पाटोपाट विकास कामांचा धडाकाच सुरू ठेवल्यामुळे ग्रामस्थांकडून पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, माजी सभापती मनोज रावराणे तसेच नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!