संजय घोगळे यांना “कोकणरत्न’ पदवी प्रदान

संजय घोगळे यांना “कोकणरत्न’ पदवी प्रदान

*कोंकण एक्सप्रेस*

*संजय घोगळे यांना “कोकणरत्न’ पदवी प्रदान*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*

वेंगुल्र्याचे सुपुत्र, लेखक, व्यंगचित्रकार तसेच अप्पर कोषागार अधिकारी संजय घोगळे यांना ज्येष्ठ पत्रकार व संपादक सचिन कळझुणकर यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान येथे “कोकणरत्न’ पदवी प्रदान करण्यात आली.
या पदवी प्रदान सोहळ्याला स्वतंत्र कोकण राज्य अभियानचे संस्थापक संजय कोकरे, मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, राजेंद्र सुर्वे, दिलीप लाड, सुभाष राणे हे पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री.घोगळे यांनी मुंबई तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्रात प्रशासकीय अधिकारी म्हणून गौरवास्पद कामगिरी केली असून यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांच्या प्रशासकीय कामामध्ये दोन वेळा उत्कृष्टकामगिरी केल्याबद्दल गौरविण्यात आले आहे. व्यंगचित्रकार म्हणून त्यांची दखल अमेरिकन वेबसाईटवरही घेण्यात आली असून लेखक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. कोकणरत्न पदवी मिळाल्याबद्दल श्री. घोगळे यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
फोटोओळी –  संजय घोगळे यांना संपादक सचिन कळझुणकर यांच्या हस्ते “कोकणरत्न’ पदवी प्रदान करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!