कणकेवाडी येथे श्रमदानातून बंधारा

कणकेवाडी येथे श्रमदानातून बंधारा

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकेवाडी येथे श्रमदानातून बंधारा*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*

“पाणी अडवा पाणी जिरवा’ या संकल्पनेतून परबवाडा – कणकेवाडीतील ग्रामस्थांनी श्रमदानातून बंधारा बांधला. उन्हाळ्यात होणारी पाण्याची टंचाईची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी गणेश कोंड या ठिकाणी हा बंधारा बांधला आहे.
या भागातील ग्रामस्थांना मे महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी दरवर्षी येथे वनराई बंधारा बांधला जातो. या बंधा-यामुळे परबवाडा तसेच उभादांडा गावाला देखील पाणी साठा वाढण्यास मदत होते. यावर्षी या सामाजिक उपक्रमासाठी परबवाडा सदस्य हेमंत गावडे, जीवन परब, संजय तेरेखोलकर, हरिश्चंद्र मांजरेकर, प्रमोद नाईक, सचिन गवंडे, हर्षल मळगावकर, साहिल मळगावकर, जालंदर मांजरेकर, प्रसाद मांजरेकर, निलेश कोनाडकर, संभाजी पिंगुळकर, उत्तम कासकर, आयुष मांजरेकर, वेदांत गावडे, पार्थ सावंत, युवराज नाईक यांच्यासह ग्रामस्थांनी मेहनत घेतली आणि श्रमदानातून गावातील हा बंधारा बांधून पूर्ण केला.
फोटोओळी – कणेकवाडी येथे श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!