आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कारासाठी आवाहन

आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कारासाठी आवाहन

*कोंकण एक्सप्रेस*

*आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कारासाठी आवाहन*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

दरवर्षीप्रमाणे यंदाही नगर वाचनालय वेंगुर्ला या संस्थेतर्फे श्रीकृष्ण सखाराम सौदागर स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार देण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 5 हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी आपले वडिल श्रीकृष्ण सौदागर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संस्थेकडे 1 लाख रूपये कायम निधी ठेवला आहे. त्यातून हा पुरस्कार दिला जात आहे. यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. तरी सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रात काम करणा¬या कर्मचा¬यांनी पुरस्कारासाठी आपले नाव, ग्रंथालयाचे नाव व इतर माहितीसह प्रस्ताव संस्थेकडे कार्यालयीन वेळेत 24 डिसेंबरपर्यंत पाठवावेत असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!