*कोकण Express*
*सिंधुदुर्गात आज चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू…*
*डॉ.श्रीपाद पाटील; जिल्ह्यात आणखीन १३१ व्यक्ती पॉझिटिव्ह…*
*सिंधुदुर्गनगरी ता.१६:*
जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ७ हजार ५३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तर सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ९७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान आज आणखी १३१ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असून ४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. मृतांमध्ये जांभवडे-कुडाळ येथील ४१ वर्षीय पुरूष आहे.त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता.सावंतवाडी येथील ६८ वर्षीय पुरुष आहे.त्याला हृदय विकाराचा आजार होता.तिर्लोट-देवगड येथील ७० वर्षीय महिला आहे.तिला अस्थमाचा आजार होता.तर सिद्धार्थवाडी-वैभववाडी येथील ८५ वर्षीय महिलेला आहे.तिला मधुमेहाचा आजार होता.