*कोंकण एक्सप्रेस**
*आठवी ते दहावीसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेतर्फे कै. पद्माकर सखाराम सौदागर स्मृती अनिल श्रीकृष्ण सौदागर स्मृती पुरस्कृत इयत्ता आठवी ते दहावी गटासाठी रविवार दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत वेंगुर्ला तालुका मर्यादित चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेसाठी नदीत पोहणारी मुले, ध्वजारोहण समारंभ, मतदान केंद्राचे (केंद्रावरील) दृश्य, पुस्तक प्रदर्शन (प्रदर्शनास) भेट यापैकी एका विषयावर चित्र काढायचे आहे. चित्रात किमान चार व्यक्तिरेखा असणे आवश्यक आहे. एका शाळेतून जास्तीत जास्त दहा स्पर्ध सहभागी होऊ शकतात. चित्र काढण्यासाठी 27.75 बाय 37.75 सेंटिमीटरचा कागद असणार आहे. कागदावर 2 सेंटिमिटर बॉर्डर सोडून चित्र काढावे. संस्थेने पुरविलेल्या कागदावरच चित्र काढायचे आहे. चित्र काढताना ट्रेस पेपर किंवा भौमितिक साधनांचा वापर करू नये. स्पर्धकाला शाळेचे ओखळपत्र आणणे आवश्यक आहे. शाळेचे ओळखपत्र, आधारकार्ड, शिक्का असलेल्या भागावर स्वत:चे नाव, इयत्ता, शाळेचे नाव व संपर्क क्रमांक घालावा. प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 1500, 1100, 900 तसेच उत्तेजनार्थ 750 ची दोन बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी शाळेमार्फत, पालकांकरवी किंवा स्वत: येऊन 23 डिसेंबर पर्यंत संस्था कार्यालयात करावयाची आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 8275667090 यावर संपर्क साधावा असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.

