*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हास्तरीय साहित्यिक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
वेंगुर्ला नगर वाचनालय संस्थेतर्फे आणि टांककर-शेट¬े ट्रस्ट पुणे यांच्यावतीने देण्यात येणा-या “स्व. रमाकांत गुरूनाथ शेटये स्मृती’ साहित्यिक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सन 2018 पासून नगर वाचनालयातर्फे जिल्हास्तरीय साहित्यिक पुरस्कार देण्यात येत आहे. यंदाचे हे सातवे वर्ष आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्रातील साहित्यिकांच्या लेखणीला प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या साहित्याचा गौरव व्हावा यासाठी टांककर-शेटये ट्रस्ट पुणे यांच्यावतीने जनार्दन गुरूनाथ शेटये यांनी संस्थेकडे 1 लाख रूपयांचा कामय निधी ठेवला आहे. या निधीतून “स्व.रमाकांत गुरूनाथ शेटये स्मृती’ साहित्यिक पुरस्कार दिला जात आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख 5 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सन 2025च्या पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्रातील साहित्यिकांनी आपले नाव, प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची नावे, मिळालेले पुरस्कार व इतर माहितीसह प्रस्ताव नगर वाचनालय वेंगुर्ला या संस्थेकडे कार्यालयीन वेळेत 24 डिसेंबर पर्यंत पाठवावेत असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांन केले आहे.

