*कोंकण एक्सप्रेस*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत सामान्य मानसिक आरोग्य कार्यशाळा संपन्न*
*कणकवली ः संजना हळदिवे*
कनेडी प्रशालेत आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट M pawer समन्वयित संवेदना प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सिंधुदुर्ग (DMHP) यांच्या वतीने सामान्य मानसिक आरोग्य कार्यशाळा गुरुवार, दिनांक- ११ डिसेंबर रोजी संपन्न झाली.
मानसिक आरोग्य म्हणजे केवळ मानसिक आजार नसणे नव्हे, तर दैनंदिन जीवनातील ताण-तणाव प्रभावीरीत्या हाताळणे, भावनिक संतुलन राखणे, सकारात्मक विचारसरणी ठेवणे, आत्मविश्वास वाढविणे आणि मानवी नातेसंबंध सुदृढ ठेवणे हेही मानसिक आरोग्याचाच भाग आहे.
ही कार्यशाळा व्यक्तीला मानसिकदृष्ट्या सक्षम, भावनिकदृष्ट्या संतुलित आणि सकारात्मक जीवनशैली अवलंबण्यासाठी मदत करते.
कार्यशाळेचे प्रमुख तज्ञ मार्गदर्शक सन्मा. श्री. अजय साठे, (सायकॉलॉजिस्ट) यांनी प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता ओळखून दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी मानवाचे मानसिक आरोग्य प्रयत्न करते. आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक जागृतता असणे होय. आज समाज्यात अनेक व्यक्ति या मानसिक आरोग्याने ग्रस्त आहेत. त्यांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नेहमीत आठ तास झोप, दररोज अर्धा तास व्यायाम, इतरांचा आदर करणे, दररोज पंधरा मिनिटे प्राणायाम करणे या चांगल्या सवयी आत्मसात केल्या तर मानसिक आरोग्य उत्तम राहते. मानसिक आरोग्याची शास्त्रीय लक्षणे- अनुवंशिकता, कौटुंबिक वातावरण, आर्थिक परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, मानसिक ताणतणाव, वाढते व्यसनाधीनता अंमली पदार्थांचे सेवन अशी काही कारणे आढळून येतात.मानसिक आरोग्याची लक्षणे- झोपेच्या वेळेतील बदल, भूक न लागणे, लक्ष केंद्रित नसणे, उदास उदास वाटणे, आत्महत्येचे वाढते प्रमाण ही काही लक्षणे दिसतात.
कार्यशाळेची उद्दिष्टे-
मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे,
मानसिक आरोग्याचे महत्व,
मानसिक आजारांवरील, गैरसमज दूर करणे,भावनिक कौशल्ये विकसित करणे,भावना ओळखणे,भावना व्यक्त करण्याची योग्य पद्धत,
ताण-तणाव नियंत्रित करणे,राग नियंत्रण,सामाजिक व संवाद कौशल्ये सुधारणे.आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास तसेच आजच्या जगात मानसिक आरोग्याची वाढती गरज लक्षात घेऊन ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. आता पर्यंत उच्च माध्यमिक विभागातीलविद्यार्थ्यांसाठी अकरा मानसिक आरोग्य कार्यशाळा घेण्यात आलेल्या आहेत.सदर कार्यशाळेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता चाचणी घेण्यात आली व जे विद्यार्थी मानसिक आरोग्य बाधित आहेत त्यांच्यासाठी गुरुवार दिनांक १७ डिसेंबर रोजी तज्ञ सायकॉलॉजिस्ट व्यक्तींचे मार्गदर्शन होणार आहे.
या कार्यशाळेसाठी प्रमुख उपस्थिती प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेला शालेय समिती सदस्य आणि पत्रकार सन्मा. नितीन सावंत यांनी भेट दिली.

