देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ ओटवणे प्रथम तर वेताळ मुंजेश्वर द्वितीय

देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ ओटवणे प्रथम तर वेताळ मुंजेश्वर द्वितीय

*कोंकण एक्सप्रेस*

*देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ ओटवणे प्रथम तर वेताळ मुंजेश्वर द्वितीय*

*गावराई येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धा जेष्ट भजनी कलाकार संत्कार संपन्न*

*सिधुदुर्गनगरी १२*

-गावराई येथील जिल्हास्तरीयभजन स्पर्धा २०२५ चा निकाल जाहीर झाला असून श्री देव रवळनाथ प्रा. भ.मंडळ ओटवणे [प्रथम क्रमांक ],श्री वेताळ मुंजेश्वर प्रा.भजन मंडळ पोइप (द्वितीय क्रमांक ), श्री राऊळ महाराज भजन पिंगुळी, [ तृतीय क्रमांक ] , रोहित निर्गुण [उत्कृष्ठ गायक बुवा ) ,. शुभम गावडे (उत्कृष्ट परवाज ) , तर (कोरस). गुरुकुल संगीत भजन मंडळ कुडाळ बुवा अद्वैत पालव आदीना सन्मानित करण्यात आले.
कुडाळ तालुक्यातील गावराई गिरोबा मंदीर येथे हरिनाम सप्ताह पर जिल्हास्तरीय भजनस्पर्धा आयोजीत केले होते यात अनेक भजन स्पर्धकानी सहभाग घेतला होता यावेळी जेष्ठ १८भजनी कलाकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी दाजी गावडे गणेश मेस्त्री सरपंच सोनल शिरोडकर ,ग्रा प सदश्य प्रणीता मेस्त्री, परिक्षक राजू सावंत, योगेश पांचाळ, संजय गावडे, प्रकाश परब ,अमित राणे , श्रीकृष्ण परब, काका मेस्त्री, अनंत गावडे, वायरमन संतोष गावडे आदी सह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते, सुत्रसंचलन स्वप्नील वेगुर्लेकर यांनी केले . गावराई गिरोबा मंदीर येथे सालाबाद प्रमाणे हरिनाम सप्ताह आयोजीत केला होता या भजन स्पर्धेमध्ये ब्राह्मण देव प्रासादिक भजन मंडळ पडवे, गुरुकुल संगीत भजन मंडळ कुडाळ, राऊळ महाराज प्रासादिक भजन मंडळ पिंगळी, रवळनाथ नवतरुण भजन मंडळ ओटवणे ,देव वेताळ मुंजेश्वर प्रासादिक भजन मंडळ पोईप,गुरुकुल भजन मंडळ न्हावेली घोडेमुख आदींचा समावेश होता सकाळी ११ वाजले पासून या हरिनाम सप्ताहाला उत्साहात सुरुवात झाली प्रारंभी ब्राह्मण देव महापुरुष प्रसादिक भजन मंडळ गावराई जिरेवाडी यांनी आपली भजन रुपी सेवा केली त्यानंतर विविध कार्यक्रम ज्येष्ठ भजनी कलाकारांचा सत्कार व त्यानंतर या भजन स्पर्धेचा कार्यक्रम पार पडला या सप्ताहाला चांगलीच रंगत आली होती गावातील पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या हरिनाम सप्ताहाचा लाभ घेतला शेवटी उपस्थिताचे आभार मानण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!