*कोंकण एक्सप्रेस*
*कळणे परिसरात ‘ओंकार’ हत्तीचा हल्ला; बैल ठार*
*दोडामार्ग/ शुभम गवस*
फोंडा–कळणे मायनिंग मार्गाने गावात घुसलेल्या जंगली ‘ओंकार’ हत्तीने बुधवारी उशिरा रात्री मोठा उच्छाद माजवला. शाहिर इस्माईल खान यांच्या जनावरांवर हल्ला करत दोन जनावरे वाचली, मात्र तिसरा बैल दोरात अडकून राहिल्याने हत्तीच्या हल्ल्यात ठार झाला.
हत्तीने शेजारील केळीबागेलाही मोठी हानी केली. वनअधिकारी घटनास्थळी येऊन पंचनामा करून गेले. काही दिवसांपूर्वी म्हशीचा बळी गेलेल्या घटनेनंतर ‘ओंकार’मुळे झालेली ही दुसरी प्राणहानी आहे.
हत्ती पुढे भिकेकोनाळ परिसराकडे गेल्याची माहिती असून कळणे भागात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

