*कोंकण एक्सप्रेस
*कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शाळा कणकवली क्रमांक तीन चे सुयश*
*शिरगांव : संतोष साळसकर*
कणकवली तालुकास्तरीय 53 वे विज्ञान प्रदर्शन विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे 9 व 10 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात पार पडले. यामध्ये सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जि प शाळा कणकवली क्रमांक तीनच्या ओम आनंद हळवे व संदेश दिलीप गावडे यांनी प्राथमिक स्तर विद्यार्थी प्रतिकृती मध्ये प्रथम क्रमांक मिळवला त्यांनी स्मार्ट बस ही प्रतिकृती तयार केली होती
या बस मध्ये वयोवृद्ध ,आजारी , स्थूल तसेच गरोदर स्त्रियांना गाडीमध्ये चढणे सोपे जावे यासाठी स्लाइडिंग गिअर व रॅक अँड पिण्यन मेथर्ड चा वापर करून बस थोडी खाली आणली जाते जेणेकरून बसच्या पायऱ्या आणि जमीन यातील अंतर कमी होऊन बस मध्ये चढणे सोपे जाते तसेच या प्रतिकृती मध्ये अपंगांसाठी स्वतंत्र रॅम ची व्यवस्था केली आहे त्यामुळे अपंग व्यक्ती कोणाच्याही मदतीशिवाय व्हील चर्चा साह्याने गाडी चढू शकते व प्रवास करू शकते अपंग व्यक्ती गाडी चढताच ड्रायव्हरने इन बटन दाबताच रॅम आत मध्ये जातो व गाडी पूर्ववत होते अशाप्रकारे अपंग व्यक्तींच्या सन्मान सुरक्षा व हक्क इत्यादीसाठी सार्वजनिक बसेस मध्ये ही सुविधा केली तर एक क्रांतिकारी पाऊल ठरेल
या प्रतिकृतीसाठी कणकवली क्रमांक तीनच्या विज्ञान शिक्षिका श्रीमती प्रतिभा खंडेराव कोतवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेने मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अक्षया राणे व सर्व सहकारी शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ सायली राणे उपाध्यक्ष श्री राकेश जाधव तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे पालक वर्ग व सर्व स्तरातून या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या सुयशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे

