*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यार्थ्यांनी गुगल चॅट जीपीटी, ए आय, नोटबुक एल एम यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करा व आधुनिकतेची कास धरा -अरुण चव्हाण, गटविकास अधिकारी*
*कणकवली ः संजना हळदिवे*
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती कणकवली आयोजित 53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2025-26 शि. प्र. मं. कणकवली संचलित विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अरुण चव्हाण साहेब गटविकास अधिकारी कणकवली , श्री मंगेश वालावलकर साहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी, कणकवली ,श्री किशोर गवस, गटशिक्षणाधिकारी कणकवली, प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी.जे. कांबळे , पर्यवेक्षक अच्युतराव वनवे,
प्रा.महालिंगे प्राचार्य कणकवली कॉलेज, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत, प्रेरणा मांजरेकर, रामचंद्र नारकर, केंद्रप्रमुख संजय पवार, विजय भोगले, सूर्यकांत चव्हाण, कणकवली तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष श्री शरद चोडणकर, तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, बोडके सर मुख्याध्यापक एस.एम. हायस्कूल, सुशांत मर्गज, निलेश ठाकूर, चंद्रशेखर पोकळे, लक्ष्मण वळवी,सांस्कृतिक विभाग प्रमुख जे. जे. शेळके तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री अरुण चव्हाण साहेब, गटविकास अधिकारी कणकवली यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना आवाहन केले की आत्ताच्या विद्यार्थ्यांनी गुगल, चॅट जीपीटी, ए आय, जेमिनी, नोटबुक एल एम यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करा व आधुनिकतेची कास धरा. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवायचा असेल तर पुस्तक आणि शाळा याबरोबरच या एप्लीकेशन्स चा वापर करता आला पाहिजे. तसेच त्यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उत्कृष्टपणे आयोजन केल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे व संस्थेचे कौतुकही केले.
यावेळी श्री किशोर गवस साहेब, गटशिक्षणाधिकारी कणकवली यांनी विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, वास्तविक जीवनातील प्रश्नांवर वैज्ञानिक उपाय सुचवणे, अंधश्रद्धा निर्मूलन करणे, चालीरीती परंपरा यातील विज्ञान समजून घेणे व विकसित भारत घडवणे हा आहे असे प्रतिपादन केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की विज्ञान प्रदर्शनातील प्रतिकृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जगासमोरील प्रश्न व समस्या बाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करणे व त्यावर उपाययोजना सुचवणे हा उद्देश ठेवला पाहिजे. अशा विज्ञान प्रदर्शनामधूनच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून भविष्यातील शास्त्रज्ञ निर्माण होतात असेही त्यांनी सांगितले.
हे विज्ञान प्रदर्शन 9 डिसेंबर ते 10 डिसेंबर असे दोन दिवस चालणार आहे. या प्रदर्शनात प्राथमिक गटात 44 व माध्यमिक गटात 20 प्रतिकृती ठेवण्यात आल्या व दिव्यांग गटात 5 प्रतिकृती ठेवण्यात आल्या. तसेच शिक्षक शैक्षणिक साधन निर्मितीत 12 प्रतिकृती व प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांच्या 2 प्रतिकृती ठेवण्यात आल्या. तसेच दोन्ही गटात निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश सिंगनाथ व आभार प्रदर्शन विद्या शिरसाट यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेचे विज्ञान शिक्षक जनार्दन शेळके, पृथ्वीराज बर्डे, शर्मिला केळुस्कर, माहेश्वरी मटकर, चित्रकला शिक्षक प्रसाद राणे, प्रयोगशाळा सहाय्यक राजेंद्र तवटे तसेच सर्वच शिक्षक व शिक्षकवृंदांनी अतिशय मेहनत घेतली . या प्रदर्शनात कणकवलीवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. कणकवलीतील विविध शाळा, शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनीही बहुसंख्येने या प्रदर्शनाला भेट देऊन विज्ञान प्रदर्शनाचे कौतुक केले.

