*कोंकण एक्सप्रेस*
*न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या प्रकाश पेडणेकर याची राज्य हॉलिबॉल संघात निवड*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट मधील इयत्ता 10 वी तील विद्यार्थी प्रकाश दीपक पेडणेकर या विद्यार्थ्याची महाराष्ट्र हॉलिबॉल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्याच्या 18 वर्षे वयोगटाखालील ज्युनिअर हॉलिबॉल संघात निवड झाली आहे.इयत्ता 5 वी पासूनच हॉलिबॉल खेळाची आवड असलेल्या प्रकाशने आपली खडतर मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर विविध निवड चाचण्या पार पाडत जिद्दीने हे यश संपादन केले आहे.त्याला प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री.ए.व्ही.पोफळे आणि श्री प्रविण पडेलकर यांचे मार्गदर्शन लाभले.प्रकाशच्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री.म.ज.सावंत, सेक्रेटरी श्री.चं.शा.लिंग्रस, खजिनदार श्री.वि.रा. तायशेटे, शाळा समिती चेअरमन श्री.द.दि. पवार, मा.संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.पी.के.पारकर, पर्यवेक्षक श्री.व्ही.पी. राठोड, सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी हार्दिक अभिनंदन केले.

