*कोंकण एक्सप्रेस*
*आदर्श ग्रंथालय पुरस्कारासाठी आवाहन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
कै.विष्णूपंत नाईक यांनी नगर वाचनालय वेंगुर्ला या संस्थेचे कार्यवाह म्हणून अनेक वर्ष काम पाहिले होते. संस्थेच्या उत्कर्षास त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून नगर वाचनालय संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्रातील उत्कृष्ट काम करणा-या ग्रंथालयाला कै.विष्णूपंत गणेश नाईक स्मृती आदर्श ग्रंथालय पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी अनंत विष्णू नाईक यांनी 1 लाख रूपयांचा कायम निधी ठेवला आहे.
शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख 5 हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्रातील ग्रंथालयांनी या पुरस्कारासाठी 24 डिसेंबरपर्यंत आपले प्रस्ताव कार्यालयीन वेळेत पाठवावेत, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.

