*कोंकण एक्सप्रेस*
*सिुधुदुर्गनगरी११ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई जाहीर*
*आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे कुडाळ मतदारसंघासाठी सर्वात जास्त नुकसानभरपाई मंजूर*
सिुधुदुर्गनगरी११ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई जाहीर झाली आहे आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे कुडाळ मतदारसंघासाठी सर्वात जास्त नुकसानभरपाई मंजूर झाली आहे
ऑक्टोबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई जाहीर झाली असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ४ कोटींची नुकसानभरपाई जाहीर झाली आहे. यात आमदार निलेश राणे यांनी जास्तीत जास्त आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचुन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्या नंतर कुडाळ तालुक्यातील ८८ ९१ शेतकरी तर मालवण तालुक्यात ३१२२ अश्या कुडाळ मतदारसंघात एकूण १२०१३ शेतकऱ्यांना मिळून एकूण २कोटी ७९ लक्ष ६० हजार ७५५ रुपये एवढी नुकसानभरपाई जाहीर झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण नुकसानभरपाईच्या ५०% पेक्षा जास्त नुकसानभरपाई कुडाळ मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळाली असून याबाबत आमदार निलेश राणे यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला आहे.
सिधुदर्ग जिल्हयात जिल्हयात अवकाळी पावसाने ऑक्टोबर नव्हेबर मध्ये ५हजार २२० हेक्टर क्षेत्रावर भात शेतीचे नुकसान झाले होते कृषी विभागामार्फत शासनाकडे याबाबात पंचनामा अहवाल सादर केला होता यात २१हजार ०७५ शेतकऱ्याचा समावेश होता सर्वांत जा स्तनु कसान कुडाळ मालवण सावतवाडी वेगुर्ले तालूक्यात झाले होते जास्तीत जास्ती नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकरी संघटनानी मागणी केली होती या बाबत आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत प्रश्न तारांकीत केला होता याची शासनाने दरवल घेऊन अवकाळी पाऊस नुकसान भरपाई देण्यास मान्यता दिली असून यानु कसान भरपाई त कुडाळ मालवण तालुक्यातील सर्वांत जास्त शेतकरी समाविष्ठ आहेत (आमदार निलेशराणे फोटो घेणे

