माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

*कोंकण एक्सप्रेस*

*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन*

*”दिव्यांग सक्षमीकरणासाठी झुंजारचे योगदान”*

*कणकवली ः संजना हळदिवे*

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत दिव्यांग विद्यार्थी व पालकांसाठी विशेष मार्गदर्शन वर्गाचे वार- बुधवार, दिनांक- १० डिसेंबर २०२५ रोजी आयोजन करण्यात आले. झुंजार दिव्यांग सामाजिक संस्था ही दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी एक नोंदणीकृत सामाजिक संस्था आहे. दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे रक्षण, शिक्षण, रोजगार, स्वावलंबन, सक्षमीकरण आणि समाजामध्ये समानतेने जगता यावे यासाठी संस्था कटिबद्ध आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या समस्या ओळखून त्यावर तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना राबवणे, तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही आधार व मार्गदर्शन देणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.या मार्गदर्शन वर्गाचे प्रमुख मार्गदर्शक कुमार- चंद्रकात चव्हाण (महाराष्ट्र अध्यक्ष, झुंजार दिव्यांग सामाजिक संस्था), सहाय्यक मार्गदर्शक- श्री.मनोज सातोसे (राष्ट्रीय अध्यक्ष), यांनी दिव्यांग योजनांची व विविध शासन उपक्रमांची माहिती दिली.

झुंजार सामाजिक संस्थेची उद्दिष्टे-दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासाची संधी उपलब्ध करून देणे.दिव्यांग हक्क, न्याय, सरकारी योजना आणि कागदपत्रांच्या प्रक्रियेत मदत करणे.समाजात दिव्यांग सक्षमीकरणाबाबत जनजागृती करणे.दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षणे देणे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल दिव्यांग बांधवांना सहाय्य व मदत.आरोग्य, मानसिक आधार आणि पुनर्वसनासाठी उपयुक्त सेवा पुरवणे.

झुंजार दिव्यांग सामाजिक संस्थेचे प्रमुख उपक्रम-
शैक्षणिक उपक्रम-दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मार्गदर्शन,धीट विद्यार्थी पुरस्कार,
विशेष शिक्षकांद्वारे शैक्षणिक मार्गदर्शन,ब्रेल साहित्य उपलब्ध करून देणे.रोजगार व कौशल्य विकास-संगणक प्रशिक्षण, मोबाईल रिपेअरिंग, हस्तकला वर्ग,रोजगार मेळावे,स्वयंरोजगार मार्गदर्शन,सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीसाठी मार्गदर्शन.
आरोग्य व पुनर्वसन-मोफत आरोग्य तपासणी,कृत्रिम अवयव वाटप,फिजिओथेरपी शिबिरे,मानसिक आरोग्य सल्लामसलत. सरकारी योजनांसाठी मदत-दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड, निवृत्ती वेतन, पेंशन योजना.शासकीय कर्ज योजना-दिव्यांग प्रमाणपत्र, प्रवास सवलत पास, आरोग्य कवच योजना.सामाजिक व जनजागृती उपक्रम- दिव्यांग दिन साजरा,हक्क जनजागृती रॅली,
समाजातील भेदभाव कमी करण्यासाठी कार्यशाळा,प्रेरणादायी व्यक्तींची भाषणे.आपत्ती व संकट काळातील मदत,पूर, दुष्काळ, महामारी येथे दिव्यांगांसाठी विशेष मदत,आवश्यक अन्नधान्य, औषधे,साधन-सामग्रीचे वितरण.
कुटुंबीय व पालक सक्षमीकरण,
पालक मार्गदर्शन शिबिरे,कुटुंब उपचार,आर्थिक नियोजन मार्गदर्शन.
या विशेष मार्गदर्शन वर्गासाठी प्रमुख उपस्थिती शालेय समितीचे चेअरमन श्री.आर.एच. सावंत, श्रीम. पूजा वाल्मिकी (राष्ट्रीय उपाध्यक्ष), प्रशाला पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, श्रीम.एच.बी. पटेल, दिव्यांग विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
मार्गदर्शन वर्गाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.सुमंत दळवी, तर आभार श्री. कोरडे बी.डी. यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!