घरकुल मनरेगा प्रश्नी विकास राजपत्रित अधिकारी सामूहिक रजेवर

घरकुल मनरेगा प्रश्नी विकास राजपत्रित अधिकारी सामूहिक रजेवर

*कोंकण एक्सप्रेस*

*घरकुल मनरेगा प्रश्नी विकास राजपत्रित अधिकारी सामूहिक रजेवर* .

*सिधुदुर्गनगरी*

घरकुल व मनरेगा योजनांमध्ये जबाबदारी निर्धारणाबाबत मागण्यांचा निर्णय न झाल्याने दि. ०८ डिसेंबरपासून सामूहिक रजा आंदोलन सुरूकरण्यात येत असल्याचे निवेदन,महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी आणिमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केले आहे
महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रीत अधिकारी संघटनेच्या वतीने अतिरीक्त जिल्हाधिकारी शुभागी साठे मुख्य कार्यकारी अधिकारी रविद खेबुडकर यांना निवेदन सादर करत शासनाचे लक्ष वेधलेयावेळी दिलेल्या निवेदनात पूर्वी पाठविलेल्या निवेदनाव्दारे दिनांक ४ व ५ डिसेंबर, २०२५ रोजी महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अधिकारी सामूहिक रजेवर जाण्याबाबत संघटनेच्या निर्णयावरून कळविण्यात आले होते. परंतु अद्यापपर्यंत घरकुल व मनरेगा योजनांमध्ये जबाबदारी निश्चिती संदर्भातील मुख्य मागण्यांवर कोणताही समन्वय अथवा सकारात्मक निर्णय झालेला दिसून येत नाही.त्या अनुषंगाने, जोपर्यंत या आशयाचा शासनस्तरावर सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील सर्व अधिकारी सोमवार दिनांक ८ डिसेंबर, २०२५ पासून पुढे मागण्या मान्य होईपर्यंत सामूहिक रजेवर राहण्याचा निर्णय कायम ठेवत आहोत व भ्रमणध्वनी वरुनही होणारे कामकाज बंद ठेवत आहोत.
या निवेदनाद्वारे सामूहिक रजा आंदोलन ८ डिसेंबरपासून सुरू असून पुढेही चालू राहील याची कल्पना देण्यात येत आली आहे,संबंधित मागण्यांचे निवेदन तसेच तपशील ई-मेलद्वारे सोबत पाठवित आहोत. कृपया आपण सदर निवेदन सकारात्मक शिफारशींसह शासनाकडे पाठवावे, अशी मागणी. केली आहे
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनातश्रीम, शितल कबनूरे / पुंडअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उदय पाटीलप्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा,श्री. जयप्रकाश परबउपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्राम पंचायत,व गटविकास अधिकारीश्री. अरुण चव्हाण,श्री. श्याम चव्हाण,श्री. अनिक्य सावंत,श्री. वासुदेव नाईक,श्री. राम बु जंगले,मंगेश वालावलकर,श्री. विनायक पाटील,श्री. प्रफुल्ल वालावलकर,श्री. पांडुरंग सावंत,श्री. यशवंत गवस,श्री दिनेश पाटकर,श्री. मंगेश जाधव,श्री. मनोजकुमार बेहरे सह उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!