डॉ. तन्मय आठवले यांना प्रतिष्ठित ISAKOS संस्थेचे सदस्यत्व प्राप्त

डॉ. तन्मय आठवले यांना प्रतिष्ठित ISAKOS संस्थेचे सदस्यत्व प्राप्त

*कोंकण एक्सप्रेस*

*डॉ. तन्मय आठवले यांना प्रतिष्ठित ISAKOS संस्थेचे सदस्यत्व प्राप्त*

*देवगड : प्रतिनिधि*

|-प्रतिष्ठित International Society of Arthroscopy, Knee Surgery & Orthopaedic Sports Medicine (ISAKOS) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेचे मानद सदस्यत्व नुकतेच देवगड मेडिकल फाऊंडेशनचे अस्थिरोग तज्ञ डॉ. तन्मय आठवले यांना प्रदान करण्यात आले असून, या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
भारतामधील केवळ ५९ ऑर्थोपेडिक सर्जन यांना या जागतिक संस्थेचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे आणि या प्रतिष्ठित यादीमध्ये डॉ. तन्मय आठवले यांचे नाव समाविष्ट होणे हे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर देवगड तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठा अभिमानाचा क्षण आहे.
डॉ. आठवले हे देवगड मेडिकल फाऊंडेशनमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत असून, त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अस्थिरोग शास्त्र संघटनांमध्ये महत्त्वपूर्ण सदस्यत्व मिळवले आहे. तसेच, त्यांनी अस्थिरोग विषयक अनेक संशोधनपत्रे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित केली असून त्यांच्या संशोधन कार्याचीही दखल घेण्यात आली आहे.
या विशेष यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून, सहकाऱ्यांकडून तसेच रुग्णांकडून डॉ. तन्मय आठवले यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

✦ डॉ. तन्मय आठवले – देवगडच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ✦

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!