५३वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत आयोजित

५३वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत आयोजित

*कोंकण एक्सप्रेस*

*५३वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत आयोजित*

*कणकवली : प्रतिनिधि*

शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली संचलित सन २०२५ – २६ तालुकास्तरीय ५३वे विज्ञान प्रदर्शन विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे आयोजित केले आहे कणकवली तालुक्यातील सर्व प्राथमिक ‘ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी या वर्षीच्या विज्ञान प्रदर्शनात सक्रीय सहभाग नोंदवून बदलत्या विज्ञान युगातील संशोधनाला साथ देण्याचा प्रयत्न करूया . या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान व कृषी विज्ञान या विषयावर प्रतिकृती मांडण्यात येणार आहेत तसेच शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तयार केलेल्या प्रतिकृती मांडण्यात येणार आहेत . विज्ञान विषयावर आधारित निबंध स्पर्धा’ वक्तृत्व स्पर्धा व प्रश्नमंजूषा स्पर्धा शालेय विद्यार्थ्यासाठी आयोजित केल्या आहेत . या आगळ्या वेगळ्या विज्ञान प्रदर्शनासाठी कणकवली तालुक्यातील सर्व शाळा व मान्यवर संस्था शिक्षण विभाग यांना निमंत्रित करण्यात आनंद होतो की जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती कणकवली आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मंगळवार दि . ९ डिसेंबर २०२५ ते बुधवार दिनांक १० डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित केले आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती
आयोजक विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!