*कोंकण एक्सप्रेस*
*ढगाळ हवामान… थंडी कमी… दिवसा जास्त उकाडा*
*आंबा – काजू कलमांवर वाढत्या किडींचे संकट!*
*शिरगांव : संतोष साळसकर*
सध्या देवगड-कोकणाचे हवामान पूर्णपणे ढगाळ, रात्रीची थंडी कमी आणि दिवसाचा उकाडा वाढलेला दिसत आहे. हिवाळ्यातील दव आणि तापमानातील घसरण आंबा –
काजू मोहरासाठी अत्यंत महत्त्वाची असते. मात्र सध्याच्या प्रतिकूल वातावरणामुळे आंबा – काजू कलमे मोहोर आणि फलधारणेवर चिंताजनक परिणाम दिसू लागले आहेत.देवगड भागात बहुतावंशी कलमाना मोहोर तर काही कलमाना पालवी फुटलेली दिसत आहे. मात्र शिरगांव परिसरात आंबा कलमाना फक्त पालवी तर काजू कलमाना मोहोर फुटलेला दिसत आहे.
यावर्षी पाऊस खूपच लांबल्यामुळे आंबा काजू कलमाना पहिल्या टप्प्यातील मोहोर सामान्यता ऑक्टोबर महिन्यात येतो तो नोव्हेंबर महिन्यापासून सुरु झाला. गुलाबी थंडी व पोषक वातावरण सध्या तालुक्यात दिसत नाही. कमी जास्त प्रमाणात थंडी पडत असून दिवसा उष्णता वाढत असल्यामुळे यंदा एक महिना आंबा- काजू हंगाम उशिरा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
*तापमानातील बदलाचे थेट परिणाम*
सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे आंबा काजू कलामाना मोहर कमी व उशिरा येत येत आहे. तसेच कोवळ्या फांद्याची अतिजलद वाढ होत असून फ़ांद्या कमकुवत दिसत आहेत. मोहरात नर फुलांचे प्रमाण जास्त, मादी फुले कमी दिसत आहे. प्रकाशसंश्लेषण कमी असल्यामुळे वाढ खुंटते.
*दमट वातावरणात कीड-रोगांचा प्रादुर्भाव दुपटीने*
सध्या देवगड तालुक्यात आंबा बागायतदार किडी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बागेतील झाडांना कीटकनाशक फवारणी करतांना दिसत आहेत. चक्री किड (Tea Mosquito Bug) हि कोवळ्या कळ्यांवर हल्ला करते त्यामुळे फुलगळति होते. त्यामुळे काजूच्या कोवळ्या भागावर काळे/तपकिरी डाग निर्माण होतात. थ्रिप्स (Thrips) या किडीमुळे मोहर व पाने चुरणे, कळी काळवंडणे तसेच फाळधारण कमी होणे आदी समस्या बागायतदाराना भेडसावत आहेत. मिलीबग (Mealy Bug) या किडीमुळे पानांवर चिकट पदार्थ, काळी बुरशी (Sooty mould), देठावर पांढरे कापूससारखे थर तयार होतात. पर्णकर (Leaf Miner) मूळे पानात वाकडे बोगदे प्रकाशनिर्मितीमध्ये घट होते. Anthracnose व Powdery मिळदेव मूळे फुल-कोवळ्या फांद्यांवर काळेजर्द डाग येतात.
*काजू बागायतदारांसाठी वाढत्या धोक्याची घंटा : समस्या परिणाम*
कमी थंडीमूळे आंबा काजू कलमांच्या फळधारणेवर मोठा फटका येऊ शकतो.
दमट वातावरण कीड-रोग वाढ तसेच
ढगाळ वातावरणामुळे उत्पादन व गुणवतेत घट होते. पहिल्या टप्प्यातील मोहराला सुरुवात झाली असून दुसऱ्या टप्प्यातील मोहोर 15 डिसेंबर नंतर येऊ शकतो असा अंदाज बागायतदार शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे.
*नैसर्गिक कीड नियंत्रण*
नीम अर्क ५% किंवा नीम तेल ३–५ मिली/लि., Beauveria bassiana / Verticillium lecanii — जैविक नियंत्रण आदी मूळे किडींवर नियंत्रण आणता येते. बुरशी नियंत्रणासाठी १% बोर्डो मिश्रण Kasugamycin + Copper संरक्षणात्मक फवारणी केल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते.
*पोषण व्यवस्थापन*
अमिनो + बोरॉन + मॅग्नेशियम फवारणी केल्यास परागण सुधारतो, फाळधारणेत वाढ होऊ शकते.
*बाग स्वच्छता*
संक्रमित फांद्यांची छाटणी, पाण्याचा निचरा योग्य राखल्यास हवा खेळती राहील. अशा पद्धतीची छाटणी करावी. अशी माहिती वळीवंडे येथील आंबा – काजू बागायतदार शेती तज्ञ राजू सावंत यांनी दिली.

