देवबाग हायस्कुलचे १० रोजी स्नेहसंमेलन

देवबाग हायस्कुलचे १० रोजी स्नेहसंमेलन

*कोंकण एक्स्पर्स*

*देवबाग हायस्कुलचे १० रोजी स्नेहसंमेलन*

*मालवण (प्रतिनिधी)*

देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन बुधवार दि. १० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता श्री. गणेश शंकर टेमकर (सहा. मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, माजी विद्यार्थी २००५) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून उद्योजक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, तारकर्ली सरपंच सौ. मृणाली मयेकर आदी मान्यवर उपस्थिती राहणार आहेत. यानिमित्त दि. ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वा. सत्यनारायण महापूजा तसेच हस्तकला व रांगोळी प्रदर्शन आयोजित केले आहे. तर १० रोजी होणाऱ्या स्नेहसंमेलनात ‘कलावंत’ चे प्रकाशन, पारितोषिक वितरण व विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख विवेक गोसावी, शाळा व्यवस्थापन समिती व शालेय स्वराज्य सभा प्रतिनिधी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!