*कोंकण एक्सप्रेस*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत उत्कर्षा अंतर्गत माता-पालक व किशोरवयीन मुलींना मागदर्शन*
*सुदृढ महिला, सशक्त कुटुंब अभियान*
*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे वार- मंगळवार, दिनांक- २ डिसेंबर २०२५ रोजी, प्रशालेत आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कर्षा अंतर्गत किशोरवयीन मुलींना व माता- पालक यांना मानसिक, शरीरिक आरोग्य व संवर्धन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.*
*उत्तम व चांगले आरोग्य ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. याच अनुषंगाने प्रशालेत वर्षभर मुलांना विविध प्रकारे आरोग्य विषयक मार्गदर्शन व शिबीरे आयोजित केली जातात. उत्कर्षा अंतर्गत विशेष आरोग्य वर्गाचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक सौ. दिक्षा दीपक कांबळे, आरोग्य सेविका, प्रा.आ.केंद्र, हरकुळ खुर्द यांनी मुलींना दैनंदिन आहार व मासिक पाळी तसेच मानसिक व शारीरिक बदल, आकर्षण वृत्तीत होणारी वाढ, प्रत्येक स्त्रीचे व मुलीचे सुदृढ शरीर व चांगले राहणीमान असावे. आहार उत्तम, योग्य असावा, आहारात फळे, भाजीपाला, मोड आलेली कडधान्य, अंडे, दुध, बदाम, काजू यांचा वापर करावा. शक्यतो जंक फुडचा वापर टाळावा. आजच्या मुली या भावी माता होणार आहात, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन हा भावी आयुष्याचा वसा आहे. एक स्त्री आजारी तर संपूर्ण कुटुंब आजारी पडते, स्त्री ही कुटुंबाची केंद्रबिंदू असते. तीने स्वतःची व कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. एखादी स्त्री आजारी असेल तर जवळच्या आरोग्य उपकेंद्रात संपर्क साधने आवश्यक आहे. सशक्त महिला, सुदृढ बालक अशी दुहेरी भूमिका तीला सांभाळावी लागते, त्यासाठी पौष्टीक व संतुलित आहाराची गरज आहे. या विषयी बहुमोल मार्गदर्शन करण्यात आले.*
*कार्यक्रमाच्या शेवटी प्रशालेतील मुलींनी ” सुदृढ महिला, सशक्त महिला” या विषयावर उत्कृष्ट पथनाट्य सादरीकरण केले. यासाठी उच्च माध्य. विभागातील सहा. शिक्षका श्रीम. पटेल एच. बी. यांनी मार्गदर्शन केले.*
*या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.सुमंत दळवी, प्रमुख उपस्थिती प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व महिला शिक्षिका, शिक्षकेतर महिला कर्मचारी, माता- पालक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होते.*
*या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी,सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका पी.एल. हाटले, तर श्रावणी कदम यांनी आभार मानले.*

