*कोकण Express*
*कासार्डे येथील विजयलक्ष्मी शांताराम मिराशी या वृद्ध आजीची भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी घेतली भेट…*
*आजींना आर्थिक मदत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक,शाखा-कासार्डे,खाते नंबर-७६८९*
कणकवली ः प्रतिनिधी ( संजना हळदिवे)
कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील विजयलक्ष्मी शांताराम मिराशी या वृद्ध आजीच्या कोसळल्या घराची करुन कहाणी मीडियावर व्हायरल झाली.त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी त्या आजींची भेट घेतली.त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
तसेच त्या आजींना आर्थिक मदत करावयाची असेल तर त्यांनी
विजयलक्ष्मी शांताराम मिराशी,सिंधुदुर्ग जिल्हा बँक,शाखा-कासार्डे,खाते नंबर-७६८९ असा आहे.तसेच रोख व वस्तू स्वरूपात करावयाची असेल तर विद्याधर नकाशे व गणेश पाताडे यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन संतोष कानडे यांनी केले आहे.