वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुक मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी मतदानाने पार पडणार आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, सहाय्यक निवडणुक अधिकारी हेमंत किरूळकर यांनी नियोजन केले आहे. या नियोजनानुसार मतदान सुरळीतपणे पार पडण्यासाठी 16 मतदान केंद्रांवर नगराध्यक्ष आणि अ भागातील नगरसेवकांना व ब भागातीलनगरसेवकांना मतदान करण्यासाठी प्रत्येकी दोन मशिन याप्रमाणे एकूण 32 मशिन असणार आहेत. तर प्रभागनिहाय 10 राखीव व दोन स्पेशल राखीव अशा मशिन निवडणुकीसाठी कार्यरत रहाणार आहेत.
या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी ओंकार ओतारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत किरूळकर यांच्या नियोजनानुसार 16 मतदान केंद्रांवर एका केंद्राध्यक्षांसह चार कर्मचारी असे एकूण 64 कर्मचा-यांची नेमणूक केली आहे. या संपूर्ण निवडणुकीसाठी तीन क्षेत्रीय अधिकारी प्रत्येकी पाच, पाच आणि सहा अशा एकूण 16 केंद्रांसाठी काम पहाणार आहेत. तसेच कायदा सुव्यवस्था बिघडू नये, शांततेच्या वातावरणात निवडणूक पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून आलेल्या सूचनेनुसार तीन नायब तहसीलदार कार्यरत रहाणार आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणी पोलिस कर्मचा-यांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदानाच्या कालावधीत वेंगुर्ला नगरपरिषदेचा कर्मचारी प्रत्येक केंद्रावर निवडणूकीचे काम पहाणा-या कर्मचा-यांना तसेच दिव्यांग, वृद्ध कर्मचा-यांना व्हीलचेअरवरून मतदान करण्यासाठीची सेवा, पाणी, जेवण व अन्य कामाकाजासाठी उपलब्ध करून ठेवण्यात आल्याची माहिती सहाय्यक निवडणुक अधिकारी हेमंत किरूळकर यांनी दिली.
दि.3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून होणारी मतमोजणी ही चार टेबलवर 4 राऊंडमध्ये निकाल जाहीर होणार आहे.
दरम्यान, आज सोमवारपर्यंतच्या निवडणुक प्रचारात, प्रचाराबाबत काही तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. त्यावर तात्काळ निवडणुक विभागाच्या भरारी पथकाने घटनास्थळी जाऊन पहाणी केलेली आहे. मात्र, कोणावरही कारवाई झालेली नसल्याचे निवडणुक विभागाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!