*कोंकण एक्सप्रेस*
*मतदारांनी निभयपणे शांततेत मतदान करा जिल्हाधिकारी -तृप्ती धोडमिसे*
*सिधुदुर्ग नगरी*
१सिंधुदुर्गात एक नगरपंचायत व तिन नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे १८ उमेदवार रिंगणात तर ७६ नगसेवक पदासाठी २७० उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत आज २ डिसेंबर रोजी होणाऱ्या या ‘ निवडणुकीत ७४ मतदान केंद्रावर सकाळी ७ .३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे त्या नंतर या उमेदवारांचे भवितव्य सीलबंद होणार आहे ,या निवडणुकीत भाजपा विरुद्ध शिंदे ची शिवसेना आघाडीतही बिघाडी :दुरंगी तिरंगी अटीतटीच्या लढती आहेत अटीतटीच्या या लढतीत कोण बाजी मारणार हे उद्या ३ डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे मतमोजणीची ही तयारी पूर्ण झाली आहे,आज होणाऱ्या मतदानासाठीप्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे तसेच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ५५० जणांवर प्रतिबंधात्मक तर एका व्यक्ती वर हद्दपारी ची कारवाई करण्यात आल्याचे सांगत मतदारांनी निर्भय शांततेत मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडपिसे यांनी केले आहे
सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिषद सभागृहात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले होते यावेळी पोलीस अधीक्षक मोहन हदिकर व इतर उपस्थित होते
संवेदनशील बूथ नाही
एक नगरपंचायत आणि तीन नगरपरिषद कार्यक्षेत्रात ७४ मतदान केंद्र असून प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे जिल्ह्यातील ७४ ही मतदान केंद्रावर कोणतेही केंद्र संवेदनशील नाही अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली
एका व्यक्तीची हद्दपारी :५५० वर प्रतिबंधात्मक
५५० व्यक्तीवर प्रतिबंधात्मक तर एका व्यक्ती ची जिल्हा बाहेर हद्दपारी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका नगर पंचायत आणि तीन नगर परिषदेच्या निवडणुका आज २ डिसेंबर रोजी पार पडत आहेत या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या अहवालानुसार ५५० व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केलीकरण्यात आली असून या दृष्टीनेआनंद शिरवलकर नामक एका व्यक्तीला कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर हद्दपरीची कारवाई करण्यात आली असूनकुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पथके सज्ज करण्यात आले आहेत तसेचमाजी सैनिक आणि बँक व अन्य ठिकाणी कार्यरत असलेल्या सैनिक कर्मचाऱ्यांचीशस्त्र वगळता नगरपरिषद आणि नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्वबंदूक पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे .
निवडणुकीसाठी ६०० पोलीस कर्मचारी सज्ज
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक साठी पोलीस प्रशासनाने ६०० पोलीस कर्मचारी याशिवाय विविध पदके कार्यरत करण्यात आले असून मतदान केंद्र व अन्य तालुक्याच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या निवडणूक कालावधीसाठी ६०० पोलीस कर्मचारी नेमण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी दिलीनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसात कणकवली मालवण सावंतवाडी आणि वेंगुर्ले या नगरपरिषद नगरपंचायत कार्यक्षेत्रात पोलीस संचालक घेण्यात आले आजही काही ठिकाणी पोलिसांचा पार पडले.
मत मोजणी केंद्र सज्ज
नगरपरिषदेच्या निवडणुका आज पार पडल्यानंतर उद्या तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने निवडणूक आयोगाच्या दिलेल्या सूचनेनुसार मालवण नगर परिषदेची मतमोजणी नगरपरिषदेमध्ये तर कणकवली वेंगुर्ले आणि सावंतवाडी नगरपरिषद मतमोजणी त्या त्या तहसील कार्यालय कार्यक्षेत्रात होणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार यांनी या दृष्टीने योग्य ते बंदोबस्त व आवश्यक ती व्यवस्था केली असून आपण व पोलीस अधीक्षक दहीकर व संबंधित निवडणूक विभागाचे अधिकारी यांनी केंद्रांची पाहणी केली असल्याची माहिती ही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मालवण येथील एकाघरामध्ये पैसे सापडल्याच्या प्राप्त तक्रारीनुसारकोल्हापूर इन्कम टॅक्स कार्यालयाकडे सदरची २०लाख रुपये रक्कम जमा करण्यात आली असून त्याबाबत योग्य ती कारवाई सुरू आहे परंतु दरम्यानच्या कालावधीत अजूनही कुठेही तक्रारी प्राप्त नाही व केलेल्या तक्रारीनुसार माहिती घेतली असता त्यावर कोणतेही साहित्य आढळून आले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले तसेच दारू वाहतुकीबाबत काही तक्रारी दाखल झाले असल्याचेही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले

