*कोंकण एक्सप्रेस*
*ओंबळ काझरवाडीत दत्तजन्मोत्सवाचा मंगल सोहळा*
*विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*
*शिरगाव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील ओंबळ काझरवाडी येथे श्री वेलकेश्वर सेवा मंडळ व काझरवाडी हितवर्धक संघ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ५ डिसेंबर या कालावधीत श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक रितीरिवाजांनुसार भक्तिमय वातावरणात हा पाच दिवसीय सोहळा साजरा होणार आहे.
सोमवार १ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता घटस्थापना व अखंड हरिनामाने उत्सवाची सुरुवात होईल. सकाळी ११ वाजता पालखी प्रदक्षिणा व देवस्थानांची भेट, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायं. ७वाजता आरती व पालखी प्रदक्षिणा आयोजित आहे. रात्री १० वाजता चाफेड–भोगलेवाडी येथील श्री गायगोठण प्रासादिक भजन मंडळाचे दिंडी भजन होणार आहे.२ डिसेंबर रोजी
सकाळी १० वाजता व सायं ७ वाजता आरती व पालखी प्रदक्षिणा. सांयकाळी ४:३० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा. रात्री १० वाजता. उंडील येथील बुवा व्यंकटेश नर व फुनगुस येथील बुवा गौरव पांचाळ यांचा डबलबारी भजनाचा कार्यक्रम होणार आहे.३ डिसेंबर रोजी
दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता फनीगेम्स, रात्री ९ वाजता. दारिस्ते–जोगेश्वरी येथील श्री त्रिमूर्ती आदिनाथ प्रासादिक भजन मंडळ बुवा स्वप्नील गोसावी यांचे संगीत भजन, तर रात्री १० वाजता. साळशी येथील सिद्धेश्वर पावणाई प्रासादिक भजन मंडळाचे दिंडी भजन होईल.४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता. महाभिषेक, १० वाजता. नाडण येथील श्री अनुभवादेव ढोल पथकाचा कार्यक्रम, दुपारी १ वाजता. महाप्रसाद. सायं. ६ वाजता. श्री दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे.
रात्री ९ वाजता. शेवरे–साईलवाडी येथील बांदकादेवी ठाणेश्वर प्रासादिक भजन मंडळ बुवा गणेश घाडी यांचे संगीत भजन, तर रात्री १० वाजता. आचरा–आडवली धाडीवाडी येथील कृषा गांगेश्वराची वारकरी दिंडी भजन मंडळाचे दिंडी भजन होणार आहे.५ डिसेंबर रोजी
रात्री ९ वाजता कुडाळ येथील श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ आणि देवगड–नाडण येथील महादेश्वर फुगडी मंडळ यांचा फुगडी जुगलबंदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पाच दिवसीय उत्सवात दररोज सकाळी तसेच सायंकाळी आरती व पालखी प्रदक्षिणा होणार आहे. तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परिसर भक्तिमय होणार असून भाविकांनी उत्सवात उत्स्फूर्त सहभागी व्हावे , असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

