*कोंकण एक्सप्रेस*
*चाफेड गावठण येथील प्राथमिक शाळेपर्यंतच्या रस्त्याच्या खडीकरण – डांबरीकरणाचे उदघाटन*
*शिरगांव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील चाफेड गावठण येथील मुख्य रस्ता ते प्राथमिक शाळा नं. 1 पर्यंतच्या सुमारे 285 मिटर लांबीच्या रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरणाचे भूमिपूजन संजय गांधी निराधार योजनेचे देवगड तालुकाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य मिलिंद साटम आणि भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेंद्र शेट्ये यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर रस्त्याचे खाडीकरण आणि डांबरीकरणासाठी सरपंच महेश राणे यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या कडे लेखी प्रस्ताव देऊन मागणी केली होती. तसेच कै. किरण मेस्त्री यांनी आपल्या सरपंच पदाच्या कालावधीत खूपमोलाचे सहकार्य केले होते. यासाठी भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम, मिलिंद साटम, राजेंद्र शेट्ये यांचेही मोठे सहकार्य मिळाले. हे काम जनसुविधा योजनेतर्गत सुमारे 10 लाख निधी मंजूर आहे.
यावेळी सरपंच महेश राणे, संजय गांधी निराधार योजना देवगड तालुकाध्यक्ष मिलिंद साटम, भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेंद्र शेट्ये, शिरगांव उपसरपंच संतोषकुमार फाटक, भाजपा शक्ती प्रमुख शैलेश जाधव, माजी सरपंच आकाश राणे, ग्रा. प. सदस्य सुनील कांडर, माजी सरपंच संतोष साळसकर, ठेकेदार सुरज चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सचिन मोंडकर, माजी सरपंच दीपाली घाडी, प्रदीप घाडी, अशोक घाडी, एकनाथ घाडी उदय राणे, प्रफुल्ल राणे, संतोष घाडी आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तित होते.

