*कोकण Express*
*वैभववाडी भाजपाच्या वतीने महामानवास अभिवादन*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
आज सर्वत्र भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वैभववाडी तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वैभववाडी तालुका भाजपा च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किशोर दळवी, प्राची तावडे, सुनिल भोगले, अनंत फोंडके आदी पदाधिकारी उपस्थित होते.