*कोकण Express*
*नाटळ येथे घरफोडी ; रोख रक्कम लंपास*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील नाटळ ( कावळेटेम्ब ) येथील बंद घर फोडून चोरट्यानी 60 हजार रोकड लांबवली. ही घटना नोव्हेंबर 2019 ते 11 एप्रिल 2021 दरम्यान घडली असून याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
मूळ नाटळ ( कावळेटेम्ब ) येथील भिसाजी रामचंद्र परब ( वय 76 ) हे पनवेल येथे वास्तव्यास असतात. परब यांचे नाटळ येथील कावळेटेम्ब येथे घर आहे. हे घर नोव्हेंबर 2019 पासून बंद आहे. 11 एप्रिल 2021 रोजी परब याना घराशेजारील व्यक्तीने घराचा दरवाजा उघडा असल्याचे फोन करून सांगितले. गुढपाडव्याला भिसाजी परब नाटळ येथील आपल्या घरी आले असता त्यांना घरफोडी झालेली दिसून आली. घरातील बॅगेतील रोख 60 हजार रुपये चोरट्यानी लंपास केले होते.याबाबत भिसाजी परब यांनी फिर्याद दिली असून कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ओरोस येथील श्वानपथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली.