*कोंकण एक्सप्रेस*
*गळफास लावून इसमाची आत्महत्या*
* वेंगुला प्रतिनिधी: प्रथमेश गुरव*
उभादांडा नमसवाडी येथील संतोष गोविंद साळगावकर, वय- (53) याने घराचे बाजूला असलेल्या काजूच्या बागेमध्ये दि. 26 रोजी 10.30 ते दि.27 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या कालावधीत नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
या घटनेची खबर पांडुरंग गोविंद साळगावकर यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशनला दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली हेडकाँन्स्टबल योगेश राऊळ करीत आहेत.

