*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेनेच्या सिंधुदुर्ग सहसंपर्कप्रमुखपदी मनोज राणे*
*सिंधुदुर्ग*
मीरा रोड मीरा-भाईंदर मराठा सेवासंघाचे कार्याध्यक्ष मनोज राणे यांची शिवसेना (शिंदे) गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सहसंपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. मनोज राणे हे अनेक वर्षापासून समाजकार्य करत आहेत. जनमानसात त्यांचे असलेले काम पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रभारी सहसंपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण प्रचार आणि प्रसार कराल, तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल अशा शुभेच्छा त्यांना देण्यात आल्या आहेत, तर पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून दिलेली जबाबदारी व पक्षवाढीसाठी मी तत्परतेने काम करून माझ्यावर ठेवलेला सार्थ ठरवेन असे मनोज राणे यांनी सांगितले आहे.

