कंपनीच्या एक कोटीपेक्षा अधिक टर्नओव्हरबद्दल स्नेहा गवस यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन..

कंपनीच्या एक कोटीपेक्षा अधिक टर्नओव्हरबद्दल स्नेहा गवस यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन..

*कोंकण एक्सप्रेस*

*कंपनीच्या एक कोटीपेक्षा अधिक टर्नओव्हरबद्दल स्नेहा गवस यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन..*

*सिंधुदुर्गनगरी : शुभम गवस*

कोकणातील शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या कोकण दोडामार्ग अॅग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने एका वर्षात एक कोटीपेक्षा अधिक टर्नओव्हर नोंदवला. या उल्लेखनीय यशाबद्दल कंपनीच्या डायरेक्टर तथा माजी झरेबांबर सरपंच स्नेहा संजय गवस यांचे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कौतुक करत अभिनंदन केले.
कंपनीमार्फत शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांना जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी डायरेक्टर स्नेहा गवस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कंपनीला प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन करण्याची विनंती केली असून, “लवकरच भेट देऊ” असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!