*कोकण Express*
*कासार्डेतील वैजंयती मिराशी यांना मिळणार हक्काचे घर…!!*
*जि.प.सदस्य संजय देसाई यांनी घेतला पुढाकार…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कासार्डेतील वैजंयती मिराशी यांच्या पडक्या घरासमोर आनंदाची उभारली गुढी..या आशयाची बातमी माध्यमांमध्ये प्रसारित झाली.त्याची दखल जि.प.सदस्य संजय देसाई यांनी घेत दोन खोल्या व संडास बाथरुमसह इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल असे जाहीर केले.त्या घराचे शुक्रवारी सकाळी १० वाजता भूमिपूजन करण्याची घोषणा संजय देसाई यांनी केली आहे.
जिल्ह्य़ातील सर्व वृत्तपत्र,इलेक्ट्रॉनिक मेडीयाचे पत्रकारांचे श्री. देसाई यांनी आभार मानले असून समाजाभिमुख पत्रकारीकेबदद्दल कौतुक केले आहे. यावेळी वैजयंती मिराशी याच्या घरी जात आपुलकीने चौकशी केली. यावेळी जि.प.सदस्य संजय देसाई यांच्यासह ग्रा.पं.सदस्य गणेश पाताडे,बाबी गाडे, विठ्ठल गाडे,भाऊ कोलते आदी उपस्थित होते.