“रस्ता करा नाहीतर आंदोलन!” विनिता घाडींचा संताप..

“रस्ता करा नाहीतर आंदोलन!” विनिता घाडींचा संताप..

*कोंकण एक्सप्रेस*

*“रस्ता करा नाहीतर आंदोलन!” विनिता घाडींचा संताप..*

*दोडामार्ग/ शुभम गवस*

झरेबांबर–उसप रस्ता महिन्यांपासून खड्डेमय अवस्थेत असून प्रशासनाने अद्याप दुरुस्ती सुरू केली नाही, अशी टीका शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख विनिता घाडी यांनी केली.
“रस्ता तात्काळ दुरुस्त करा; नाहीतर खड्ड्यात बसून आंदोलन करू,” असा कडक इशारा त्यांनी बांधकाम विभागाला दिला.

स्थानीय नागरिकांनीही अपघाताचा धोका आणि दैनंदिन गैरसोयीबद्दल नाराजी व्यक्त केली असून प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!