*कोंकण एक्सप्रेस*
*अपक्ष उमेदवार बबलू मिशाळ यांची प्रचारात मुसंडी…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शिवसेनेचे नेते तथा आमदार दीपक केसरकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे बबलू मिशाळ हे प्रभाग क्रमांक ५ मधून अपक्ष राहून आपले नशीब आजमावत आहेत. या ठिकाणी गेली अनेक वर्षे आपण काम केल्यामुळे निश्चितच मतदार आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. श्री. मिशाळ यांनी या ठिकाणी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. अपक्ष उमेदवार असताना सुद्धा त्यांच्या प्रचाराला मोठी गर्दी दिसत आहेत तर दुसरीकडे स्थानिक व प्रभागातील उमेदवार आहेत. त्यामुळे आपण मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

