*कोंकण एक्सप्रेस*
*खांबाळे देवी आदिष्टीचा १ डिसेंबरला जत्रोत्सव*
*वैभववाडी (प्रतिनीधी)*
खांबाळे येथील श्री देवी आदिष्टीचा हरिनाम सप्ताह व जत्रोत्सव १ डिसेंबरला होत असून त्यानिमित्त भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
खांबाळे येथील श्री देवी आदिष्टीचा हरिनाम सप्ताह व जत्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. या जत्रोत्सवानिमित्त भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, गोवा आणि सिंधुदुर्गातील नामवंत बुवांचा यामध्ये समावेश आहे. मुंबईतील बुवा श्रीधर मुणगेकर, महिला बुवा आरती पाळेकर, दोडामार्ग आणि गोव्यात प्रसिध्द बुवा गीतेश कांबळी, विराज तांबे, हेमंत तेली आणि रोशन तांबे यांची भजने रसिकांना ऐकता येणार आहेत.
या सप्ताहाचा प्रारंभ १ डिसेंबरला स. ९.३० वा. घटस्थापनेने होणार आहे. त्यानंतर सर्व भाविकांसाठी श्री देवी आदिष्टीचे दर्शन आणि ओटी भरता येणार आहे. सकाळी ९.३० वा. घटस्थापना, १० ते सायकांळी ४.१५ वा. स्थानिक भजने, सायकांळी ४.३० वा. भजन महोत्सवाचे उद्घाटन, रात्रौ १२ वा. पालखी सोहळा, उर्वरित भजन महोत्सव आणि त्यानंतर स्थानिक भजने होणार आहेत. २ डिसेंबरला अभिषेक आणि दुपारी १ वा. महाप्रसाद असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे.

