मंत्री उदय सामंत यांची आज कणकवलीत कॉर्नर प्रचार सभा

मंत्री उदय सामंत यांची आज कणकवलीत कॉर्नर प्रचार सभा

*कोंकण एक्सप्रेस*

*मंत्री उदय सामंत यांची आज कणकवलीत कॉर्नर प्रचार सभा*

*आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर विकास आघाडीच्या प्रचारार्थ सभा*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे कणकवली शहर विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी सायंकाळी ७ वाजता कणकवलीत कॉर्नर सभा घेणार आहेत. यावेळी आमदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे दोन्ही नेते कॉर्नर सभेमध्ये काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कणकवली शहरातील संदेश पारकर यांच्या निवासस्थानानजीकच्या ढालकाठी येथे ही कॉर्नर सभा होणार आहे. कणकवली शहर विकास आघाडीतर्फे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर हेच नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. या आघाडीमध्ये उबाठा शिवसेना, शिंदे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे पक्ष सहभागी आहेत. आमदार निलेश राणे यांनी तर शहर विकास आघाडीला निवडून आणण्याची जबाबदारीच स्वतःकडे घेतली आहे. एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप व शिवसेना यांची युती होऊ न शकल्याने शिंदे शिवसेनेचे नेते नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर कणकवलीत येत असलेले मंत्री उदय सामंत हे काय भूमिका घेणार? सोबत निलेश राणे शहरवासीयांना काय आवाहन करणार, याकडे कणकवलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!