*कोंकण एक्सप्रेस*
*विकास आणि रोजगाराच्या मुद्द्यावर अन्नपूर्णा कोरगावकर मैदानात…*
*सावंतवाडीकर नक्कीच पुन्हा संधी देतील; व्यक्त केला विश्वास…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. त्यांच्या कामाची पद्धत लक्षात घेता त्यांना शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काही झाले तरी विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी पुन्हा एकदा अन्नपूर्णा कोरगावकर यांच निवडून येतील, असा विश्वास मतदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सौ. कोरगावकर यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात जोरदार आघाडी घेतली आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर त्यांनी भर ठेवला आहे. आपल्याला मत म्हणजे विकासाला मत असे त्यांचे म्हणणे आहे. त्या दृष्टीने त्यांनी. आपला प्रचार सुरू केला आहे. आम्हीच्या कोरगावकर कुटुंबियांची सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली आहे. अनेक लोकांच्या सुख दुःखात रुग्णवाहिकेच्या माध्यमातून मी कायम सेवा दिलेली आहे. तसेच १२० हून अधिक युवकांना रोजगार देऊन आम्ही भविष्यात किमान १० ते १२ हजार लोकांना रोजगार मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात येथील जनतेने आपल्या पाठिशी उभे राहावे, असे आवाहन यावेळी कोरगावकर यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यावेळी अखिलेश कोरगावकर, ऐश्वर्या कोरगावकर, व्यंकटेश शेठ, अवधूत नाटेकर, विनिता नाटेकर, एलिडा डिसोजा, शितल डिसोजा उपस्थित होते.

