*कोकण Express*
*ग्रामपंचायत, निगुडे या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*
*बांदा ः प्रतिनिधी*
ग्रामपंचायत, निगुडे या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली निगुडे गावचे प्रथम नागरिक श्री समीर गावडे यांनी बाबासाहेबांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी.कोणालाही जमणार नाही,अशी क्रांती करून दावली,जातीयवाद्याला देऊन टक्कर,चवदार ओंजळ भरून दावली,निसर्ग नियमाप्रमाणे,पाणी आग विझवते.पण भिमाने तर पाण्यालाच आग लावली.काळ कसोटीचा आहे.पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे.करोना महामारीचा आहे.ही जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करूया.विश्वरत्न,विश्वभूषण,भारतरत्न,महाविद्वान,महानायक,अर्थशास्त्री,महान इतिहासकार,संविधान निर्माता,क्रांतीसूर्य,युगपुरुष,परमपूज्य बोधिसत्व,महामानव,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आदिम,हार्दिक अशा शुभेच्छा. सर्वांना दिलेल्या यावेळी प्रास्ताविक माजी ग्रामपंचायत सदस्य श्री वसंत जाधव यांनी केले व त्यांनीही बाबासाहेबांचे विचार मांडले यावेळी निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे, ग्रामपंचायत सदस्य समीक्षा गावडे, ग्रामसेवक तन्वी गवस, अंगणवाडी सेविका अंजली राणे, नूतन निगुडकर, रंजना सावंत, मदतनीस लक्ष्मी पोखरे, भाग्यलक्ष्मी शिरसाट, विश्राम जाधव, किशोर जाधव, गौतम जाधव, गौरेश जाधव, जानवी जाधव, अनिल जाधव, लवु जाधव आदी मान्यवर उपस्थित होते तसेच निगुडे समाज मंदिर याठिकाणीही जयंती साजरा करण्यात आली.